Life Insurance Claim Reject Reasons: लाईफ इन्शुरन्स क्लेम नाकारला जाण्याची मुख्य कारणे काय आहेत? जाणून घ्या सर्व माहिती!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Life Insurance Claim Reject Reasons: लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी घेतलेला एक महत्त्वाचा आधार आहे. परंतु बऱ्याचवेळा या पॉलिसी अंतर्गत घेतले जाणारे क्लेम्स नाकारले जाऊ शकतात. यामागील काही कारणांमुळे आपल्या कुटुंबाला अपेक्षित आर्थिक मदत मिळत नाही तर अनेक वेळा मोठ्या अडचणींचाही सामना करावा लागू शकतो. या लेखाद्वारे लाईफ इन्शुरन्स क्लेम्स नाकारले जाण्याची कारणे काय आहेत आणि ते टाळण्यासाठीचे कोणते उपाय किंवा आपण काय दक्षता घेतली गेली पाहिजे याबद्दल माहिती दिली आहे. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

लाईफ इन्शुरन्स क्लेम नकार मिळण्याची मुख्य कारणे

A) पॉलिसी लॅप्स होणे: आपल्या पॉलिसीचे प्रीमियम ग्रेस पिरियड मध्ये वेळेवर न भरल्यास पॉलिसी लॅप्स होते. त्यानंतर योजनाधारकाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाला तर क्लेम नाकारला जाऊ शकतो. अशा पद्धतीने क्लेम नाकारण्याचे कारण सर्वसामान्य आहे. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर पॉलिसी लॅप्स असल्यास नामनिर्देशित व्यक्तीस कोणताही लाभ दिला जात नाही.

काय करावे? आपला प्रीमियम ग्रेस पिरियड मध्ये वेळेवर भरा. विमा कंपनीकडून येणाऱ्या ईमेल किंवा एसएमएस सूचनांकडे दुर्लक्ष करू नका. ग्रेस पीरियडचा लाभ घ्या आणि प्रीमियम लवकरात लवकर भरा. (Life Insurance Claim Reject Reasons)

B) चुकीची किंवा अपूर्ण माहिती प्रदान करणे: लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेताना चुकीची माहिती किंवा अपूर्ण माहिती दिल्यास दावा नाकारला जाऊ शकतो. उदा. वय, वैद्यकीय इतिहास, धोकादायक सवयी यांची अचूक माहिती दिली पाहिजे.

काय करावे? इन्शुरन्स अप्लिकेशन फॉर्म भरताना संपूर्ण आणि सत्य, खरी माहिती द्या. पॉलिसी डाक्युमेंट्स मिळाल्यानंतर त्यातील माहिती तपासा आणि चुकीच्या गोष्टी दुरुस्त करा.

C) नामनिर्देशित व्यक्तीची माहिती अद्ययावत नसणे: जर पॉलिसीतील नॉमिनी व्यक्तीचे नाव चुकीचे असेल किंवा अपडेट केलेले नसेल, तरी दावा नाकारला जाऊ शकतो.

काय करावे? आपल्या जीवनातील घडामोडींनंतर जसे कि लग्न, मुलाचा जन्म, इ. नामनिर्देशित व्यक्तीची माहिती अपडेट करा. नियमितरित्या विमा कागदपत्रे तपासा.

D) वैद्यकीय इतिहासाचा खुलासा न करणे: पॉलिसी घेताना वैद्यकीय इतिहास लपविल्यास दावा नाकारला जाऊ शकतो. काही वेळा विमा कंपन्या वैद्यकीय तपासण्या करतात. त्यावेळी लपवलेल्या आजारांमुळे समस्या होऊ शकतात.

काय करावे? वैद्यकीय तपासणी वेळेवर पूर्ण करा. पूर्वीच्या आजारांविषयी प्रामाणिक राहा आणि त्यांचा खुलासा करा.

E) इतर विमा पॉलिसींची माहिती लपविणे: इतर विमा पॉलिसींबाबत माहिती लपवल्यास विमा कंपनीला फसवणूक झाल्याचा संशय येऊ शकतो, ज्यामुळे दावा नाकारला जातो.

काय करावे? सर्व विद्यमान विमा पॉलिसींबद्दल माहिती प्रामाणिकपणे द्या. नवीन पॉलिसी घेताना जुनी पॉलिसी नमूद करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Life Insurance Claim Reject Reasons
Life Insurance Claim Reject Reasons

F) दावा उशिरा सादर करणे: पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर दावा उशिरा दाखल केल्यास विमा कंपनीकडून संशय निर्माण होतो.

काय करावे? पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर शक्य तितक्या लवकर दावा सादर करा. आवश्यक कागदपत्रे (मृत्यू प्रमाणपत्र, विमा कागदपत्रे इ.) वेळेत सादर करा.

जीवन विमा दावा सुरक्षित करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय

  • प्रामाणिक माहिती द्या: वय, व्यवसाय, जीवनशैली, आरोग्यविषयक माहिती पूर्णपणे व प्रामाणिकपणे भरा.
  • पॉलिसीचे अटी व शर्ती समजून घ्या: कव्हरेज मर्यादा, वगळण्याच्या अटी आणि दाव्याच्या प्रक्रियेबद्दल पूर्ण माहिती घ्या.
  • प्रीमियम वेळेवर भरा: प्रीमियम वेळेवर न भरल्यामुळे पॉलिसी रद्द होण्याचा धोका असतो.
  • पॉलिसी नियमितपणे पुनरावलोकन करा: आर्थिक परिस्थिती, लग्न, किंवा मुलांचा जन्म यांसारख्या जीवनातील बदलांनुसार पॉलिसी अपडेट करा. (Life Insurance Claim Reject Reasons)
  • कागदपत्रे जतन करा: विमा कागदपत्रे, नामनिर्देशित व्यक्तीची माहिती, मृत्यू प्रमाणपत्र इ. व्यवस्थित ठेवा.

निष्कर्ष: Life Insurance Claim Reject Reasons

लाईफ इन्शुरन्स हा आपल्या कुटुंबासाठी एक महत्त्वाचा आर्थिक आधार असतो. मात्र, चुकीच्या गोष्टींमुळे दाव्यास नकार मिळू शकतो. वरील टिप्स लक्षात ठेवून तुम्ही तुमच्या पॉलिसीचा लाभ तुमच्या कुटुंबापर्यंत पोहोचवू शकता. योग्य पॉलिसी निवडण्यासाठी IRDAI च्या मार्गदर्शक सूचना तपासा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

नवीन लेख व अपडेटसाठी आमच्या ब्लॉगला भेट द्या!

Please enable JavaScript in your browser to complete this form.
Name